‘मराशिप’ संघटनेकडून मतदार जनजागृती अभियान
चामोर्शी : राज्यात, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागाचे विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावा आणि पदाधिकाऱ्यांनी मतदार जनजागृती अभियानांतर्गत २९ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात जाऊन ज्येष्ठ समाजसुधारक प्रकाश आमटे व त्यांची पत्नी मंदा आमटे आणि लोकबिरादरी हायस्कूल हेमलकसा येथे भेट देऊन मतदार जनजागृती केली. याप्रसंगी जिल्हा संघटन मंत्री दिलीप तायडे, बाळबुद्धे, देशमुख नैताम, कुलकर्णी, कापगते आदी उपस्थित होते.
