मराशिपचे ३० मे रोजी नागपूरात धरणे आंदोलन
कुनघाडा रै :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फ शुक्रवार, ३० मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ पर्यंत नागपूर येथील संविधान चौकात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
नवीन संच मान्यता आदेश रद्द करावेत, मे २०१२ नंतरची बोगस नियुक्ती, बोगस शालार्थ आयडी व बोगस अल्पसंख्याक दर्जा घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश निर्गमित करावे आदी मागण्या करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केले आहे.
