निरंतर काम करणारी शिक्षक संघटना म्हणजे शिक्षक परिषद

जिल्हाध्यक्ष :

मिनानाथजी सातपुते

लोकवाहिनी न्यूज

नागपूर : दिवसेंदिवस शिक्षकांच्या समस्या वाढत आहे. या समस्या सोडविण्यासाठी माजी शिक्षक आमदार नागो गाणार लढा देत आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते चोविस तास सज्ज आहे. म्हणजेच शिक्षक परिषद ही शिक्षकांची संघटना, शिक्षकांच्या हक्काच्या लढाईसाठी निरंतर लढा देत आहे. असे शिक्षक परिषदेचे नागपूर जिल्हाध्यक्ष मिनानाथजी सातपुते यांनी आज शिक्षक परिषदेने कन्हान येथे आयोजित केलेल्या अधिवेशनात केले यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नागो गाणार, माजी आमदार सुधाकर कोहळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.

पुढे असे म्हणाले की, आजरोजी कोणत्याच शिक्षक संघटनेचे स्वतंत्र कार्यालय नाही. मात्र शिक्षक परिषदेचे संघटना, शिक्षकांच्या हक्काच्या स्वंतत्र कार्यालय आहे. त्यामुळे समस्याग्रस्त शिक्षकांना थेट कार्यालयात संपर्क साधता येतो. शासन जर शिक्षकांच्या विरोधात शासन निर्णयांचे परिपत्रक काढत असेल, तर त्या शासन परिपत्रक विरोधात प्रथम आवाज उठविण्याचे काम शिक्षक परिषद ही संघटना करते. नतंर इतर संघटनांना जाग येते. शिक्षकांवर जे ऑनलाईन कामे लादली आहे. ती कामे बेकायदेशीर आहे. ही कामे तात्काळ बंद झाली पाहिजे. शिक्षणाधिकारी कार्यालयातील अनेक कामे संथगतीने सुरू आहे. आर्थिक मोहापायी या कार्यालयातील बडे अधिकारी तुरुंगात गेले. तरी पैसे घेतल्याशिवाय लिपीक कामे करतांना दिसत नाही. वेळ आल्यावर त्यांना अद्दल घडविल्याशिवाय आमची शिक्षक परिषद संघटना गप्प बसणार नाही. आज घडीला अनुकंपा तत्वावरील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी फाईल्स धुळखात पडल्या आहेत. त्या निकाली निघतांना दिसत नाही. ही बाब एक शोकांतिका म्हणावी लागेल. अशा महत्वपूर्ण प्रलंबित कामांच्या विरुद्ध आम्ही काही दिवसात शिक्षणाधिकारी यांना जाब विचारणार आहोत. असेही म्हणाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारशिवणी तालुकाध्यक्ष साबळे, कार्यवाह मेघरे सह पारशिवणी तालुक्यातील शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. विशेष म्हणजे नागपूर विभागाचे कार्यालयीन मंत्री सुधीर वारकर यांनी कार्यक्रम नियोजनबद्ध करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *