महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नाशिक यांच्याकडून निवेदन
सादर:- शालार्थ आयडी मिळालेल्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काही तांत्रिक कारणाने विलंब झाल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन थांबवू नये. तसेच कागदपत्रे अपलोड साठी 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळावी यासंबंधीचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे कडून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे कक्ष प्रमुख गाडे साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
वास्तविक बघता शालार्थ आयडी चे सर्व कागदपत्रे हे शिक्षणाधिकारी या उपसंचालक कार्यालयाकडून वेतन पथकास एक प्रत दिलेलीच असते तरीही त्यांनी संस्था व शाळेकडून या कागदपत्रांची मागणी केलेली आहे. हा सर्व दस्तावेज व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करण्यासाठी थोडा वेळ दिला तर ते योग्य होईल. यात काही विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवणे हे अन्यायकारक असेल शालार्थ मधील 2012 ते 2016 या कालावधीत शालार्थ आयडी हा कोणत्याही पत्रा शिवाय फक्त नंबर जनरेट केलेला आहे. त्या कर्मचाऱ्यांची कागदपत्र अपलोड करण्यासाठी मोठी अडचण होत आहे. याकडेही कार्यालयाने लक्ष देणे गरजेचे आहे.
निवेदन देताना शिक्षक परिषदेचे शहराध्यक्ष उपप्राचार्य संजय पाटील सर, उपाध्यक्ष- विजय बडे सर, विलासजी सोनार सर, संदीप सरोदे सर, रणदिवे सर, विलास सानप सर, शेवाळे सर ,नेरकर सर ,पाटील सर घोलप सर उपस्थित होते .
निवेदनावर परिषदेचे विभागीय कार्यवाह -सचिन पाटील सर, जिल्हाध्यक्ष -दत्ता पाटील सर, संघटन मंत्री -शरदराव निकम, महिला आघाडी प्रमुख- सुमनताई हिरे , शहर कार्यवाह -विनीत पवार सर, बी.के जाधव सर, कोषाध्यक्ष- सचिन मेेधने सर, युवराज दानी, शिंदे सर यांनी स्वाक्षरी केलेली आहे.
