महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर कार्यकारिणी निवडणूक
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर शहर कार्यकारिणीची निवडणूक अविरोध पार पडली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र पटले, कार्यवाह प्रमोद बोढे,कोषाध्यक्ष सुनील शेळके, उपाध्यक्ष अनिल डहाके व सय्यद सलीम या सर्व उमेदवारांची निवड अविरोध झाली. विरोधात कोणत्याही उमेदवाराने अर्ज सादर न केल्यामुळे दि. ३० ऑगस्ट रोजी सायं. ५ वाजता निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभाग कार्यालय मंत्री सुधीर वारकर यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. विजयी उमेदवारांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे अभिनंदन करण्यात आले.
(तभा वृत्तसेवा)
