जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
• चामोर्शी, १७ सप्टेंबर
अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघ व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्याशी संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा गडचिरोली
यांच्या वतीने टीईटीसंदर्भातील शिक्षण क्षेत्रातील गोंधळ संपुष्टात आणण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले की, केंद्र शासनाच्या दिनांक २३ ऑगस्ट २०१० आणि २९ जुलै २०११ च्या अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने इयत्ता १ ली ते ८ वीला अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने इयत्ता १ ती ते ८ वीला शिकविणाऱ्या शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेसह टीईटी ही किमान पात्रता शासन निर्णय १३ फेब्रुवारी २०१३ अन्वये दिनांक १३ फेब्रुवारी १०१३ पासून बंधकारक केली. वर्षे ६ ते १४ वयोगटांच्या बालकांना इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांची डीएड/बीएड पात्रतेसह टीईटी ही किमान शैक्षणिक पात्रता १३ फेब्रुवारी २०१३ पासून अंमलात आणण्यात आली.

(तभा वृत्तसेवा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *