टीईटीसंदर्भातील गोंधळ संपुष्टात आणावा
शिक्षक परिषदेची मागणी :जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघ व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्याशी संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने टीईटीसंदर्भातील शिक्षण क्षेत्रातील गोंधळ संपुष्टात आणण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले की, केंद्र शासनाच्या दिनांक २३ ऑगस्ट २०१० आणि २९ जुलै २०११ च्या अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने इयत्ता १ ली ते ८ वीला अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने इयत्ता १ ती ते ८ वीला शिकविणाऱ्या शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेसह टीईटी ही किमान पात्रता शासन निर्णय १३ फेब्रुवारी २०१३ अन्वये दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ पासून बंधकारक केली.
वर्ष ६ते १४ वयोगटाच्या बालकांना इयत्ता १ ली ते ८वी मध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांची डी.एड / बी.एड पात्रतेसह टी.ई.टी. ही किमान शैक्षणिक पात्रता १३ फेब्रुवारी २०१३ पासून अंमलात आणण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने टी.ई.टी.संदर्भात १ सप्टेंबर २०१५ रोजी दिलेल्या निवाड्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात इयत्ता १ ली ते ८ वी ला शिकविणाऱ्या शिक्षक समुदायात प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी आहे.
या पदाधिकाऱ्यांनी केली अधिकाऱ्यांशी चर्चा
१ – टीईटी परिक्षेच्या सक्तीमुळे शिक्षक समुदाय भीतीच्या वातावरणात निराशेच्या मानसिकतेत अध्यापनाचे काम करत आहे. राज्य सरकार व शिक्षण विभागाने या संदर्भात फेर विचार करून शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
२ -अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर शिक्षक परिषदेचे संघटनेचे नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, जिल्हा अध्यक्ष अनिल नुतीलकंठावार, संघटनमंत्री विश्वजित लोणारे, कार्यवाह सागर आडे, संतोष जोशी यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
३ -यावेळी इमरान पठाण, दिलीप तायडे, रेखा नाकाडे, देवेंद्र नाकाडे, साहिल धाकडे, वेणुगोपाल ठाकरे, नरेश चुटे, जनार्दन म्हस्के, जितेंद्र भैसारे, अतुल सुरजागडे, कोडाप, पंकज भोगेवार,एल.के.बोरकर हजर होते
