कर्तृत्ववान महिलांना मिळाली

सासवड शहर, ता. ११ :

“आपले संस्कार व आपली संस्कृती हेच आपले सुरक्षा कवच असते. योग्य संस्कार व संस्कृतीचा अवलंब करून समाजात वावरणाऱ्या महिला आज उच्च पदावरती कार्यरत आहे. त्यांचा आदर्श घेऊन आपणही आपले संस्कार व संस्कृती जपत आपले ध्येय मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ” असे मत सेवानिवृत्त प्राचार्या चंद्रसेना मुरकुटे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्यशिक्षक परिषद पुरंदरच्या वतीने सीता रामदास अभंग यांच्या स्मरणार्थ ‘जिजाऊ- जिजाऊ सावित्री सन्मान’ या पुरस्काराचे महिलांचा सन्मान केला.

यावेळी भगवानराव साळुंखे, महाराष्ट्र राज्यशिक्षक परिषदेचे पुणे विभाग संघटन मंत्री रामदास अभंग, प्राचार्य नंदकुमार सागर, दिलीप नेवसे, प्राचार्य दत्ताराम रामदासी, कुंडलिक मेमाणे, सुधाकर जगदाळे, तानाजी झेंडे, संदीप टिळेकर आदी उपस्थित होते.

संगीता रिकामे यांनी प्रास्ताविक केले. तर महाराष्ट्र राज्यशिक्षक परिषदेच्या कार्याची माहिती रामदास अभंग यांनी दिली. कार्यक्रमासाठी शिवहार लहाने, राजेंद्र बडे, हिरामण सहारे, प्रशांत कदम, दत्तात्रेय गायकवाड, विजय पिलाणे, दीपक भोसले, दत्तात्रेय बनकर, अर्चना उबाळे, मेघा कामथे, विकास भोसले, जितेंद्र कोकणी, बिभीषण देडे, विनय तांबे, किशोर जगताप यांनी प्रयत्न केले. स्वाती कामथे यांनी सूत्रसंचालन केले तर अश्विनी सावंत यांनी आभार मानले.

पुरस्कारार्थी महिला : संजना गोसावी, पद्मिनी कानगुडे, अर्चना लडकत, संगीता रूपनवर, अर्चना यादव, शबनम पठाण, वैशाली पवार, शर्मिला देशमुख, वैशाली इंदलकर, वर्षा कोलते, मंजूषा गायकवाड, नीलम होले, जगताप, संगीता रासकर, पुनम जाचक- अमृता कटके, रमा चौधरी.

 

संस्कार, संस्कृती हेच आपले सुरक्षाकवच: चंद्रसेना मुरकुटे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *