गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन हवे
नागपुर: महाराष्ट्राचे दैवत व विद्येची देवता गणपती उस्तवाला बुधवार २७ ऑगस्ट २०२५ पासून सुरुवात होत आहे.सदर उत्सव मोठया उत्साहात व आनंदात घरोघरी साजरा करता यावा यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे नियमित वेतन २५ ऑगस्टपूर्वी वितरित करण्यात यावे.अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राजाध्यक्ष नागो गाणार निवेदनातून शासनाकडे केली आहे.
राज्य शासनातर्फे गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे.याचा विचार करता ऑगस्टचे नियमित वेतन गणेशोत्सवापूर्वी वितरित करण्याचा आदेश तत्काळ निर्गमित करून समाज भावनेचा आदर करावा अशी मागणी केली आहे.
जा.क्र. – एन. जी. / माजी/वि.प.स./१४८४/२५ १८/०८/२०२५
प्रति,
१) मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, २) मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे,
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२ महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२
३) मा.ना.श्री. अजितदादा पवार, ४) मा.ना श्री. दादाजी भुसे,
उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२ महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२
५) मा. रणजीतसिंह देओल, ६) मा. सचिंद्र प्रताप सिंह,
शिक्षण सचिव, आयुक्त (शिक्षण),
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२
मार्फत:- शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर
विषय:- १) गणेशोत्सवापूर्वी माहे ऑगस्ट चे नियमित वेतन वितरित
करण्याचा आदेश निर्गमित करण्याबाबत…
२) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे दि. १४/०८/२०२५
चे निवेदन
मा. महोदय/ महोदया,
महाराष्ट्राचे दैवत व विद्येची देवता गणपती उत्सव बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ पासून साजरा करण्यात येत आहे. सदर उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात घरोघरी साजरा करण्याकरिता माहे ऑगस्ट २०२५ चे नियमित वेतन दि.२५ ऑगस्ट २०२५ पुर्वी वितरित करणे अत्यावश्यक व निकडीचे आहे. राज्य शासनातर्फे गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. ही अत्यंत आनंदाची, सन्मानाची व अभिनंदनीय बाब आहे.
आपणांस विनंती करण्यात येते की, माहे ऑगस्ट चे नियमित वेतन गणेशोत्सवापूर्वी वितरित करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करून समाज भावनेचा आदर करावा.
धन्यवाद!
