महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सभा

गडचिरोली, २६ एप्रिल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीच्या सहविचार सभेचे आयोजन २४ एप्रिल रोजी विदर्भ इंटरनॅशनल स्कूल गडचिरोली येथे करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षक आमदार व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी उपस्थित राहून उपस्थितांना विधायक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात राज्य महिला आघाडी प्रमुख पुजा चौधरी, नागपूर विभागाचे कार्यवाह सुभाष गोतमारे, विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, उपशिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक विवेक नाकाडे, गेडाम, लेखाधिकारी साळुंके, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिल कंठावार, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष जोशी यांच्यासह विविध पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी नागो गाणार यांचा शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सहा तास चाललेल्या या चर्चासत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ३० सामूहिक व १४ वैयक्तिक समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. संतोष सुरावार यांनी समस्यांची नियमबद्ध मांडणी करून संबंधित अधिकान्यांशी खुल्या चर्चेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

नागो गाणार यांनी शिक्षण क्षेत्रातील नियम, कायदे आणि प्रशासनातील दिरंगाई यावर उदाहरणांसह मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी समस्यांचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी भुसे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रयत्नशील होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सहविचार सभा ही खरोखरच मार्गदर्शक ठरते. त्यामुळे अशी सहविचार सभा दर तीन महिन्यांनी घेण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले.

सभेस गोपाल मुनघाटे, जीवन ऊईके, विश्वजित लोणारे, दिलीप तायडे, इम्रान पठाण, साळवे, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, कार्यवाह, शिक्षक प्रतिनिधी तसेच वेतन अधीक्षक व शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन जिल्हा कार्यवाह सागर आडे यांनी केले.

(तभा वृत्तसेवा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *