हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ सलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे अंतर्गत हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान
या मोहिमे अंतर्गत 1 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील शिक्षक,विद्यार्थी, शिक्षण प्रेमी यांनी हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान अंतर्गत राज्यातील शाळांच्या मध्ये उपक्रम राबवला यासाठी शिक्षक परिषदेस भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्यालय मंत्री निरंजन गिरी,मुंबई विभाग अध्यक्ष सुहास हिर्लेकर, उपाध्यक्ष बाबाराव कातकडे,निलेश खाडे व पदाधिकारी उपस्थित होते.
